प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

जयपूर (राजस्थान) : राजस्थानमधल्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यात रेखाने तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात तिचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

रेखा निनामा हिला मंगळवारी (ता. 21) रात्री सासरच्या मंडळींनी तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचं कळताच त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात टाकून पळ काढला. त्यानंतर माहिती मिळताच घंटाळी पोलिस ठाण्याने जिल्हा रुग्णालयात पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘जामलीमध्ये राहणारी रेखा निनामा हिचा करमोडामधले रहिवासी चेतन बूज याच्यासोबत 3 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. हे दोघेही शिकत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. रेखाच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे, की चेतन आणि त्याचे वडील दिनेश हे रेखाला रोज मारहाण करीत होते. मंगळवारी रात्री रेखाने तिची बहीण ममता हिला फोन करून सांगितलं, की तिला मारहाण केली जात असून, काहीही होऊ शकतं. काही वेळाने रेखाच्या सासरच्यांनी फोन करून तिने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांना सांगितले.’

रेखाच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र तोपर्यंत रेखाचा पती चेतन आणि सासरे दिनेश यांच्यासह सासरच्यांनी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात सोडून पळ काढला होता. त्यानंतर कुटुंबीयांच्या माहितीवरून घंटाळी पोलिस स्टेशनने घटनास्थळ गाठून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. रेखाच्या शरीरावर मारहाणीच्या आणि जखमांच्या खुणा असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!