
प्रसिद्ध अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी…
मुंबईः पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिने मोहाली पोलिसांकडे तक्रार दाखल करत परदेशात बसलेल्या एका गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिमांशीने पोलिसांना सांगितले की, तिच्या अधिकृत ई-मेल आयडीवर खंडणीची मागणी करणारा ई-मेल आला होता. या ई-मेलमुळे तिने तत्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी शनिवारी सोहाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 308(4) (खंडणी) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस अधीक्षक (तपास) सौरव जिंदाल यांनी सांगितले की, “तक्रारीनुसार संबंधित ई-मेलमध्ये परदेशात असलेल्या गँगस्टरने पाठविल्याचा दावा असलेला व्हॉइस नोट होता, ज्यामध्ये 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.” पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ई-मेल आणि व्हॉइस मेसेजचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
View this post on Instagram
हिमांशी खुराना ही अभिनेत्री आणि मॉडेल असून ती 2013 मधील पंजाबी चित्रपट Sadda Haq मधील भूमिकेमुळे ओळखली जाते. तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे तसेच ती Bigg Boss च्या तेराव्या पर्वातही सहभागी झाली होती.
अभिनेता कमाल आर खान याला ओशिवरा पोलिसांनी केली अटक…
प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…
दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…

