प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…

जयपूर (राजस्थान): व्यावसायिक लतेश गोयल यांचा घराच्या बाल्कनीतून संशयास्पद परिस्थितीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून, पत्नी स्नेहाने वडिलांना बाल्कनीतून ढकलून मारल्याचा आरोप लतेश गोयल यांचा मुलगा हनी गोयल याने केला आहे. पोलिसांनी स्नेहाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या मृत्यूपूर्वी रस्ता अपघातात आई आणि बहीण गमावलेल्या हनीने स्नेहासोबत प्रेमविवाह केला होता.

लतेश गोयल आणि सून स्नेहा यांच्यात 11 ऑगस्ट रोजी वाद झाला होता. त्याचवेळी स्नेहाने रागाच्या भरात धावत सासऱ्याला 15 फूट उंच बाल्कनीतून ढकलून दिले. त्यानंतर मुलगा हनी त्याच्या जखमी वडिलांना रुग्णालयात घेऊन गेला, परंतु दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडिलांचा मृत्यू होण्यापूर्वीच स्नेहाने घरातून सोने-चांदी आणि रोख रक्कम घेऊन पळ काढल्याचे हनीने आपल्या आरोपात म्हटले आहे.

व्यावसायिक लतेश गोयल यांचा मुलगा हनी गोयल याने त्यांच्या गोडाऊनसमोर राहणाऱ्या स्नेहा डेसोबत 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेमविवाह केला होता. पण लग्न झाल्यापासून घरात भांडणे होत होती. याच तणावामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले आणि ते घरी न राहता गोडाऊनमध्ये राहू लागले. 10 ऑगस्टच्या रात्रीही ते मद्यपान करून गोडाऊनमध्ये थांबले होते. पण मुलाच्या आग्रहास्तव घरी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा घरात भांडण सुरू झाले आणि सून स्नेहाने सासऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यास सांगितले आणि भांडण सुरू झाले. भांडण सुरू असताना तिने त्यांना खाली ढकलले. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी स्नेहा विरुद्ध या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हनीने सांगितले की, ‘2011 मध्ये फतेहपूर सिक्री येथे झालेल्या अपघातात आई आशा गोयल आणि बहीण निशी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोघे पिता-पुत्रच घरात राहत होते. हनीने त्याच्या वडिलांना स्नेहा डेवरील प्रेमाविषयी सांगितले तेव्हा त्यांनी लग्नाला संमती दिली. पण, लग्नानंतर सुन आणि सासऱ्यामध्ये भांडण होत होते. या भांडणातून सुनेने सासऱ्याला मारल्याचा आरोप हनीने केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!