हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…

सांगली : दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बंडगरवाडीत (ता. कवठेमहांकाळ) येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास बाप-लेक गेले होते. तलावामध्ये पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय 48) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (18, रा. दोघेही करोली टी, ता. कवठेमहांकाळ) या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली. पोलिस पुढील तपास कतर आहेत.

तलावालगतच्या ग्रामस्थांना धुणे दिसले, मात्र जवळपास कोणी दिसत नसल्याने संशय आल्याने पाण्याजवळ जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह दिसले. घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना देण्यात आली. सांगलीच्या भारती विद्यापीठ रेस्क्यू टीम रेस्क्यू टीमने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री दहाच्या सुमारास मृतदेह कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिस कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुंडलापूर गावावर शोककळा पसरली आहे. शिवाय, कुटुंबातील बाप-लेकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांना मोठे दुःख झाले आहे.

घरात झोपी गेलेली श्रेया अचानक ओरडून जागी झाली अन्…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाट ठरला कारणीभूत…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!