जुळ्या मुलींच्या मारेकऱ्याला शोधून काढलं AI ने; 19 वर्षे होता फरार…

तिरुवनंतपुरम (केरळ) : 10 फेब्रुवारी 2006 रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील आंचलजवळ येरम इथं एक अविवाहित महिला आणि तिच्या 17 दिवसांच्या जुळ्या मुलींची हत्या करण्यात आली. तेव्हापासून पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत होते. अखेर AI ने त्या मारेकऱ्यांना शोधून काढले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रंजिनी (वय २४) ही महिला दिबिल कुमारस नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 24 जानेवारी 2006 रोजी रंजिनी या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यानंतर दिबिल रंजिनीपासून दूर राहू लागला. रंजिनीने केरळ राज्य महिला आयोगाकडे दिबिलबद्दल तक्रार केली. त्यानंतर आयोगाने डीएनए चाचणी करायला सांगितले. यात तोच त्या जुळ्या मुलींचा बाब असल्याचे सिद्ध झाले.

दिबिल कुमार याने रंजिनी आणि तिच्या मुलींच्या हत्येचा कट रचला. कुमारने त्याचा मित्र राजेशला रंजिनीकडे पाठवले. राजेशने रंजिनीच्या कुटुंबियांना लग्नासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने कुमारला खुनात साथ दिली. हत्येच्या दिवशी रंजिनीची आई जुळ्या मुलांचे जन्म दाखले घेण्यासाठी पंचायत कार्यालयात गेली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा तिला घरात तिच्या मुलीचे आणि नातींचे मृतदेह दिसले होते.

दोघेही 2006 मध्ये भारतीय लष्करात 45 ए. रेजिमेंटमध्ये होते. हत्येनंतर दोन्ही आरोपी रेजिमेंटमध्ये न परतता पळून गेले होते. केरळ पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला, मात्र यश आले नाही. या दोघांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. 2010 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं, परंतु एजन्सीही त्याला पकडण्यात अपयशी ठरली. अखेर केरळ पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला.

आरोपीची ओळख जाणून घेतली आणि सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या फोटोंची तुलना केली. एका फोटोत कुमार एका लग्नात सहभागी होताना दिसत होता. हत्येच्या 19 वर्षांनंतर दोघं पुद्दुचेरीमध्ये ओळख बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. कुमारने त्याचं नाव विष्णू आणि राजेशने त्याचं नाव प्रवीण ठेवले होते. त्यांनी लग्न केले आणि मालमत्ताही विकत घेतली. पोलिस पुद्दुचेरीत पोहोचली. 3 जानेवारी रोजी चेन्नई सीबीआयने दोघांनाही अटक करून कोची येथे आणले. एर्नाकुलमच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…

वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!