लोणीकंद पोलिसांची हातभट्टीवर कारवाई; पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी टाकलेल्या हातभट्टीच्या छाप्यामध्ये ७० लिटर दारु जप्त करुन, १००० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, ऍल्युमिनिअमचा पाईप इ साहित्य जागीच ताब्यात घेवून नष्ट केले आहे.

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. हातभट्टीच्या दारुमुळे जनसामान्याचे आरोग्य धोक्यात येवून त्यांचे शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याने ०९/१०/२०२३ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईगंडे यांनी सपोनि रविंद्र गोडसे व त्यांच्या तपास पथकाची एक टिम तयार करुन त्यांना योग्य ते निर्देश देऊन मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने रवाना केले होते. त्यानुसार सपोनि गोडसे, व त्यांच्या टिमने त्यांची वाहने एका विशिष्ट अंतरावर लावून तेथून पेरणे गावचे हद्दीत कदम वस्ती जवळ, दशरथ वाळके यांचे शेत जमीनीलगत ओढया जवळ धनाजी परदेशी यांचे घराचे पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टीच्या धंदयावर प्रभावी छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये ७० लिटर दारु जप्त करुन, १००० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप इ साहित्य जागीच ताब्यात घेवून नष्ट केले. लोणीकंद पोलिस स्टेशनला ०९/१०/२०२३ रोजी गु.र.क्र. ८१३ / २३ कलम महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ) (ब) (क), ८३ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयात हातभट्टी चालक यास लोणीकंद पोलिसांनी ०९/१०/२०२३ रोजी अटक करण्यात आले असून, सदर गुन्हयातील आणखी एक पाहिजे आरोपी फरार आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक ७४४७ अजित फरांदे हे करीत आहेत.

दरम्यान, मौजे भावडी, पिंपरी सांडस, पेरणे गावचे हद्दीत व पोलिसांनी यापूर्वी प्रभावी छापा टाकुन हातभट्टी उध्वस्त करुन गुन्हा दाखल करुन धंदा चालकांविरुध्द कारवाई केली होती.

सदरची कामगिरी रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, शशीकांत बोराटे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, संजय पाटील, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, मारुती पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सिमा ढाकणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलिस हवालदार संदीप तिकोणे, पोलिस नाईक विनायक साळवे, पोलिस नाईक स्वप्निल जाधव, पोलिस नाईक अजित फरांदे, लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे. यापुढेही लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्ये चालू असल्यास लोणीकंद पोलिस स्टेशन मोबाईल नंबर ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी केले आहे.

लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…

लोणीकंद पोलिसांनी वेशांतर करून पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास पकडले…

लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…

लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!