ध्रुवचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा केला वापर; सीसीटीव्हीत तपासले तर…

पुणे : पुणे शहरातील बावधन येथील युवकाचा मृतदेह खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय 18) याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. ध्रुवचे कुटुंबिय रविवारपासून त्याचा शोध घेत होते. मात्र, मृतदेह आढळल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा दुचाकी घेऊन नाल्यात पडला होता. मात्र याच परिसरात मोठी झाडी आहे आणि गवतही आहे. त्यामुळे तो पडला आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. रस्त्याजवळची झुडपे काढताना त्याची गाडी दिसली. या गाडीचा शोध घेतला असता. ध्रुवचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी अपघात होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ध्रुवचे आई-वडिल आणि त्याची आजी हे सणसुदीसाठी अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले होते. ध्रुव त्याच्या बावधनच्या घरी एकटाच होता. घरी एकटाच असल्याने त्याच्या आत्याने विचारपूस केली होती. त्यावेळी आत्याला तो घरी नसल्याचे समजले. त्यानंतर आत्याने सीसीटीव्ही पाहिले असता. तो रात्री एकच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्याचे दिसून आले. त्यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांकडे दिली होती.

पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा होते. त्यानंतर त्याचं वाई परिसरात दिसत होते. मात्र रविवारपासून त्याचं लोकेशन पोलिसांना सापडत नव्हते. धृव आणि त्याच्या कुटुंबियांनी पाच दिवस त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेवट खंडाळ्याजवळ तो आणि त्याची दुचाकी सापडली.

दरम्यान, ध्रुवचा शोध घेण्याचा त्याच्या कुटुंबियाांनी सोशल मीडियाचादेखील वापर केला. अनेक गृपवर मेसेज फॉरवर्ड करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावरील ग्रुपवरील अनेकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृतदेह समोर आल्यामुळे सोनावणे कुटुंबियांना मोठे दुःख झाले आहे.

हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

घरात हीटर लावताच विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू…

धक्कादायक! भालाफेकीचा सराव करताना भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!