अल्पवयीन मुलीचा झोपेत असताना केला विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पवन टेकाम विरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपली होती. आरोपी पवन पांडुरंग टेकाम (वय २२ वर्षे, रा. पार्डी नस्करी (पोड) ता. घाटंजी) हा घरात शिरून तिच्या शेजारी येऊन झोपला. अचानक अल्पवयीन मुलगी झोपेतून जागी झाल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून लज्जास्पद स्पर्श करून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचे तोंड दाबले. याच दरम्यान शेतातील मशागतीचे काम आटोपून अल्पवयीन मुलीचे वडील घरी परतले. त्यांचा आवाज ऐकून आरोपी पळून गेला.

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पिडीतेने घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 332(c), 74 तसेच पोक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुशील शर्मा, साजिद खान हे करीत आहे.

कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…

अहिल्यानगर! अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक…

हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवतीचा डॉक्टरने केला विनयभंग…

पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…

प्राध्यापकाने सहकारी महिला प्राध्यापिकेचा केला विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!