सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात आढळलेल्या अमेरिकन महिलेचे खळबळजनक आरोप…
सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या घनदाट जंगलात एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी महिलेची सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे.
कायी कुमार एस नावाची ही महिला सुरवातीला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्या पतीवर आरोप केले. पतीने मारहाण करून घातक आणि चुकीची औषधे दिली. तसेच याठिकाणी जंगलात बांधून ठेवल्याची माहिती तिने दिली आहे. तिला आता उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आले आहे. तपासासाठी तामिळनाडू, गोवा, मुंबईत पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. सावंतवाडीतील मडुरा रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येणार आहे. योगाभ्यासासाठी भारतात ती आल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय, अमेरिकन सरकारने सुद्धा दखल घेतली आहे.
अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. बांदा पोलिस ठाणे येथे पती सतीश याच्यावर सोमवारी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे करत आहेत.
पोलिसकाका Video News: ३1 जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
धक्कादायक! परदेशी महिलेला जंगलात साखळीने झाडाला बांधलं…
दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…
धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या नादात मुलगा पडल्याचा मेसेज आईने वाचला अन्…