
नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर एक ‘गाठोडे’ घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. हे गाठोडे नक्की कशाचे होते? त्यात काय होते? आणि त्याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलिस आता सखोल तपास करणार आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडल्यानंतर आरोपी भीमराव कांबळे हा घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. मात्र, यावेळी त्याच्या खांद्यावर एक मोठे गाठोडे असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली रक्ताने माखलेली कपडे किंवा हत्यार या गाठोड्यात दडवले होते का? असा सवाल उपस्थित होत आहे. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हे गाठोडे कोठे नेले, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
शवविच्छेदन अहवालात चिमुकलीच्या शरीरावर बोथट आणि टणक हत्याराने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने हे हत्यार नक्की कोणत्या दुकानातून खरेदी केले किंवा कोठून मिळवले? तसेच त्या गाठोड्यात हेच हत्यार होते का? याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने गांभीर्य ओळखून आरोपीच्या कोठडीत १२ मे पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, राज्यात संतापाची लाट असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव आरोपीला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…
पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…
पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…
जळगाव हादरलं! प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, मोबाईल तपासला अन्…
महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…
पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…
सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी…
पुणे! चिमुकली पाळण्यात निपचित पडलेली तर पत्नीच्या गळ्याला दोर…
महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…

