पोलिस भरती! मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती; पाहा कारण…

मुंबई : पोलिस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. यासंदर्भात अप्पर पोलिस महासंचालकांचे संबंधित विभागांना पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्याने असा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अप्पर पोलिस महासंचालकांच्या या निर्णयामुळे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील पोलिस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरता ब्रेक लागला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया दोन महिन्यांपासून राज्यभरात सुरू आहे. अद्याप अनेक ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिस भरतीसाठी मराठा समाजाच्या उमेदवारांनी EWS प्रवर्गातून पोलिस भरतीसाठी अर्ज केल्याने निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. मराठा उमेदवारांच्या नियुक्ती बाबत धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांची शासनाला विनंती केली आहे. अशातच शासननिर्णय होईपर्यंत EWS प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अप्पर महासंचालक कार्यालयाकडून EWS प्रवर्गातील उमेदवारांना SEBC अथवा खुल्या प्रवर्गाची निवड करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र नाशिक जिल्हयातील तात्पुरत्या निवड यादीतील EWS प्रवर्गातील 6 पैकी 4 मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अप्पर महासंचालकांच्या नव्या आदेशाने या उमेदवारांची भरती रद्द न होता, तात्पुरती स्थगित करण्यात आल्याने मराठा उमेदवारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. यामुळे आता शासन निर्णय काय होतो? आणि आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या पोलिस भरतीबाबत नेमकी काय भूमिका प्रशासन घेते? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पोलिसकाका Video News: ३1 जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…

पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…

पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!