पोलिसकाका Video News: ३1 जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू
अकोला: अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता जय मालोकर (वय २४) याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. आंदोलनानंतर त्याला हृदयविकाराचा धक्का आला होता. ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातच त्याची प्राणज्योत मालवली आहे. जय मालोकरच्या अचानक जाण्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार
पुणेः पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. पुणे शहरात १०० अन् ५० वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांची यादी तयार केली जात आहे. त्यात १०० हून अधिक वेळा नियमभंग करणाऱ्या २१ वाहनधारक सापडले आहेत. तसेच ५० हून अधिक वेळा नियमभंग करणाऱ्या ९८८ वाहनांची यादी मिळाली आहे. आता अशा वाहनचालकांचा परवाना रद्द केला जाणार आहे.

१ ऑगस्टपासून Fastagचे नवे नियम होणार
मुंबईः फास्टॅगशी संबंधित सेवांवर १ ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार आहे. आता वाहन घेतल्यानंतर ९० दिवसांच्या आत वाहनाचा नोंदणी क्रमांक फास्टॅग नंबरवर अपलोड करावा लागणार आहे. केवायसीच्या अटींची पूर्तता करण्यासाठी १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत मिळणार आहे.

पुणे शहरात लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त
पुणेः कात्रज परिसरातून 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून राजस्थानमधील दोघांना अटक केली आहे. या दोघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेरबंद
पुणेः वाघोली येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील ०५ पाहिजे आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट ६ला यश आले आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ठाणेः शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून 15 लाखांचे मोबाईल पळवले
ठाणे : मोबाईलसह इलेक्ट्रानिक साहित्य विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून शोरूम मधील जवळपास 15 लाखाचे मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला असून पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

केरळमध्ये भुस्खलनात 93 जणांचा मृत्यू
वायनाड: केरळच्या वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे भुस्खलन झाले आहे. यामध्ये आतापर्यंत 93 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 128 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पूर्ण ताकदीने वायनाडला केंद्राने मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात सशस्त्र दरोडा; चिमुकल्यासह चौघांना बेदम मारहाण
बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केरूळ येथील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी एका दीड महिन्याच्या बाळासह चार जणांना बेदम मारहाण केली. या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरोड्यात दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नेपाळच्या 12 वर्षीय मुलीवर बदलापुरात अत्याचार
ठाणेः नेपाळ वरून एक कुटुंब कामाच्या शोधात ठाणे येथे आले असून, एका 12 वर्षीय मुलीवर घरात घुसुन बळजबरीने अत्याचार करण्यात आला आहे. अत्याचाराच्या घटनेमुळं पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बैलांनी बैलगाडी ओढत वाचविले मालक मालकिणीचे प्राण!
बीडः मालक-मालकणीच्या च्या अंगावर वीज पडल्याचे पाहून बैल सैरभैर झाला हंबरडा फोडत राहिला. मालक शुद्दीवर आल्यावर दोघेही चाचपडत गाडीत बसले. बैलांनी शिंगाने जू उचलून घेत गाडी घरी घेऊन आले आणि हंबरडा फोडू लागले. बैलांचा हंबरडा पाहून मालकाच्या मुलगा धावत आला आणि आई-वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोघांचा बैलामुळे जीव वाचला आहे.

धारावीमध्ये अंत्ययात्रेवर दगडफेक
मुंबई : धारावीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची हत्या करण्यात आली. अरविंद वैश्य यांच्या अंत्ययात्रेवेळी दगडफेकीची घटना घडली आहे, यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!