धक्कादायक! परदेशी महिलेला जंगलात साखळीने झाडाला बांधलं…

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल-सोनुर्ली येथील जंगलात एक परदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका गुराख्याच्या जागरुकतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील रोनापल येथील जंगलात सकाळी गुराखी गुरं घेऊन गेला असताना त्याला महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. कोण रडतंय याचा शोध घेतला, तेव्हा त्याला महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत दिसली. याबाबत गुराख्याने लगेच ग्रामस्थांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसही जंगलात दाखल झाले. या महिलेचे नाव ललिता कायी कुमार (वय ५०) असून ती तामीळनाडूची रहिवासी आहे, पण ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याची माहिती पुढे आली आहे.

महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. मुसळधार पाऊस आणि काही दिवस उपाशी राहिल्याने महिला बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. सावंतवाडी पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवले आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर महिलेबद्दल अधिक माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित महिलेचे पतीशी भांडण झाल्याने पतीकडून हा प्रकार केला गेला असावा, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…

पत्नीचे अनैतिक संबंध अन् नवऱ्याची तालिबानी शिक्षा…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!