
अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे छापे…
नवी दिल्ली : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई आणि दिल्ली येथे छापे टाकले आहेत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील खासदार-आमदार जया प्रदा यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना जया प्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिस या बॉलिवूड अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची पथकं दिल्ली आणि मुंबईत दाखल झाली आहेत. पोलिसांनी जया प्रदा यांच्या रामपूरसह, दिल्ली आणि मुंबईतील ठिकाणांवरही छापा मारला. मात्र अद्याप पोलिसांना त्या सापडलेल्या नाहीत. सध्या पोलिसांसमोर १० जानेवारीपर्यंत त्यांना शोधून आणून न्यायालयात हजर करण्याचे आव्हान आहे.
जयाप्रदा रामपूर मतदारसंघातून २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध स्वार आणि केमरी पोलिस ठाण्यात आचारसंहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आचारसंहिता लागू असताना रस्त्याचं उद्घाटन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय पिपलिया मिश्र गावात सभेमध्ये आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं होतं.
जया प्रदा यांच्याविरोधातील प्रकरणाची सुनावणी एमपीएमएलए स्पेशल कोर्टमध्ये सुरू आहे. या प्रकरणी गेल्या अनेक तारखांना जयाप्रदा न्यायालयात हजर राहिल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यासोबत न्यायालयाने पोलिस अधीक्षकांचे पथक स्थापन करून अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी राजेश द्विवेदी यांच्या एका पथकाला दिल्ली, मुंबईला रवाना केले. मात्र दोन्ही ठिकाणी त्या नसल्याचे आढळले. पोलिसांच्या अचानक छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.
ऑस्कर विनिंग अभिनेत्याचा कारमध्ये सापडला मृतदेह…
अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…
Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…
ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

