नवरी पळून गेल्यामुळे नवरदेवाचे तिच्या घरासमोर १३ दिवसांपासून आंदोलन…
जयपूर (राजस्थान) : एका युवतीचा विवाह ठरला होता. पण, विवाहापूर्वीच तिने प्रियकरासोबत पळ काढल्यामुळे विवाह ठरलेल्या युवकाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. युवती परत आल्यानंतर विवाह लावून देण्यात आला. पण, परत पळून गेल्यामुळे नवरदेव तब्बल १३ दिवसांपासून तिच्या घरासमोर आंदोलनाला बसला आहे. याघटनेमुळे पाली परिसरात चर्चेला उधान आले आहे.
मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तिचा सगळीकडे शोध घेतला, पण सापडली तर ती कुठेच नाही. याप्रकरणी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सेणा गावातील एका युवतीचे लग्न ठरले होते. पण, लग्नापूर्वीच ती प्रियकरासोबत पळून गेली आहे. यामुळे तिचा होणारा नवरा आणि सासरचे थेट उपोषणालाच बसले आहेत. तब्बल १३ दिवस ते तिच्या घरासमोर ठिय्या देऊन बसले. युवती परत आल्यानंतर दोघांचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर युवती माहेरी आल्यानंतर पुन्हा पळून गेली आहे.
दरम्यान, युवती पळून गेल्यानंतर वराकडचे संतापले आणि त्यांनी वधूच्या कुटुंबीयांकडे तिला शोधून परत आणण्याची मागणी केली. ते थेट वधूच्या घराबाहेर आंदोलनासाठीच बसले. वऱ्हाडी 13 दिवस तिथेच तळ ठोकून बसल्याने वधू अखेर परत आली आणि लग्न केले. पण लग्नानंतर माहेर आल्यावर पुन्हा पळून गेली आहे. विवाहीत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘मुलगी 4 ऑक्टोबर रोजी सासरहून माहेरी आली होती. 6 ऑक्टोबर रोजी घरी परत जाण्यासाठी तिने सासू आणि सासऱ्यांना परत फोनही केला होता. रात्री सगेळ झोपल्यानंतर ती एका युवकासोबत पळून गेली. चार दिवसांपासून आम्ही तिचा शोध घेत आहोत. मे महिन्यात तिचे लग्न होते तेंव्हा ती पोटदुखीचा बहाणा करून ३ मे रोजी लग्नातून पळून गेली होती. पण वराकडचे 13 दिवसअडूनच राहिल्याने ती परत आली आणि 16 मे रोजी आम्ही तिचं लग्न लावले आहे.’
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…
दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…