पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…

पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आले असून, दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. वानवडी परिसरातील ही घटना आहे. या हाणामारीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांतील टोळक्याकडून झालेल्या हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

वानवडी परिसरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. टोळक्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची हत्या झाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या टोळक्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान, पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंगला टॉकीज समोर दोन दिवसांपूर्वी टोळक्याकडून एकाची हत्या करण्यात आली. नितीन मोहन म्हस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. मंगला टॉकीजला नितीन चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी टोळक्याने त्यात्यावर हल्ला करून त्याची हत्या केली.

नितीन म्हस्केवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच प्रकरणात झालेल्या वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या चार दिवसांत अशा पद्धतीने दोन खूनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…

पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!