पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल…

मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने महत्वाचा निर्णय घेतला असून, पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल केला आहे. नवी मुंबई पोलिस मुख्यालय येथे 15 ते 17 एप्रिल रोजी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. मात्र, लोकसभा निवडणूक पाहता 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यावेजी 29, 30 एप्रिल आणि 2 मी रोजी होणार आहे. बाकी इतर तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे विचारात घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. तथापि भारतीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता दिनांक 19, 26 व 27 एप्रिल 2024 रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे दिनांक 29, 30 एप्रिल 2024 व 2 मे 2024 या दिवशी पोलिस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.’

पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?

वेळापत्रकात बदल…
19 एप्रिलचा ग्राउंड 29 एप्रिलला होणार आहे.
26 एप्रिलचा ग्राउंड 30 एप्रिलला होणार आहे.
27 एप्रिलचा ग्राउंड 2 मे रोजी होणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 25 एप्रिल रोजी मतदान केंद्रांवर मतदार प्रतिनिधी जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असून, या कारणाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत असलेल्या अंतिम आणि उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी परभणीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्राद्वारे कुलगुरू यांच्याकडे केली आहे. निवडणूक तात्काळ म्हणुन हे पत्र असल्याने या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

कंत्राटी पोलिस भरतीबाबत गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!