
हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने बाळाला जन्म दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय, परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
ग्रेटर नोएडात राहणाऱ्या युवतीचे लग्न सिकंदराबादमधील एका युवकासोबत झाले होते. नवरीला वाजतगाजत सासरी आणण्यात आले. हनीमूनच्या दिवशीच नवरीच्या पोटात दुखू लागले होते. सासरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर गर्भवती असल्याचे सांगताच धक्का बसला. धक्कादायक म्हणजे दुसऱ्याच दिवशी नवरीने बाळाला जन्मही दिला. तेव्हा तर सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हे सात महिन्यांचं बाळ होतं.
वधूपक्षाने आपली फसवणूक केल्याचा आरोप वरपक्षाने केला आहे. नवरीचे पोट फुगलेले दिसत होतं. त्याबाबत विचारले असता तिच्या घरच्यांनी युवकाच्या घरच्यांना तिचे किडनीचं ऑपरेशन झाले असल्याचे सांगितले होते. यानंतर वरपक्षाने वधूपक्षाला बोलावलं आणि नवरीला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. तेव्हा नवरीचे माहेरचे तिच्यासह बाळाला घेऊन घरी गेले. या प्रकरणी वरपक्षाने वधूपक्षा विरोधात पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पण, परिसरात चर्चा रंगली आहे.