पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पुणे : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सोनाली धनाजी धुमाळ (वय 25, रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. सोनाली हिच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली धुमाळ ही विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. ती उरुळी कांचन परिसरात माहेरी राहत होती. मागील एक वर्षापासून ती पोलिस भरतीची तयारी करीत होती. आई-वडील बाहेर गेल्यानंतर सोनाली हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनाली हिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास करत आहोत.

गुढ वाढले! वसतीगृहात युवतीची हत्या अन् सुरक्षा रक्षकाची आत्महत्या…

युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

घरात झोपी गेलेली श्रेया अचानक ओरडून जागी झाली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!