प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून वेशांतर करून पकडले…
भिवंडी : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी वेशांतर करून पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मधु प्रजापती (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर मधील एका घरात महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील किचनमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मात्र, तिच्या सोबत राहणारा प्रियकर घटनेच्या दिवसापासून फरार झाला होता. फरार प्रियकराला पोलिस पथकाने वेषांतर करून पश्चिम बंगालच्या एका रुग्णालयाच्या दारातच झडप घालून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मधू ही नवऱ्यापासून विभक्त राहात होती. आरोपी शब्बीर हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यात राहणारा असून त्याला पत्नी आणि आठ वर्षाची मुलगी आहे. तो कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अंबरनाथ एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. त्यावेळी दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी कोनगाव भागात गणेश नगर येथील खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, आरोपी प्रियकर हा मृत महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. 15 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये याच कारणावरून भांडण होऊन आरोपी शब्बीरने मधूचा धारदार कटरने गळा चिरला तसेच दोन्ही हातच्या नसा कापून तिला ठार मारले आणि घराला बाहेरून कुलुप लावून पळून गेला होता.
दरम्यान, खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार आणि गुन्हे पोलिस निरीक्षक दीप बने हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील किचनमध्ये मधूचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर कोनगाव पोलिसांसह फॉरेन्सिक पथक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठवला.
मृत मधूची मैत्रीण अनिता शर्मा (रा.कोनगाव ) हिच्या फियादीवरून आरोपी शबीर याच्यावर 19 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भादंवि कलम 302 प्रमाणे कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार कटर जप्त केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तरदिनाजपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून तो मूळ गावी असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली.
घटनेच्या दिवशी प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो पश्चिम बंगालमधील सासुरवाडी असलेल्या सारापूर गावातील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेल्याचे समोर आले. एपीआय वैभव चुंबळे, विनोद कडलक यांच्यासह कोनगाव पोलिस पथक रुग्णालयात आवारात वेषांतर करून सापळा रचला होता. त्याच सुमाराला हातच्या दुखापत झालेल्या ठिकाणी उपचार करून बाहेर पडताच, त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पश्चिम बंगालवरून 21 सप्टेंबर रोजी कोनगाव पोलिस ठाण्यात आणून त्याला अटक केल्याची माहिती पोलिस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीप बने करीत आहेत.
प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…
प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…
प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…
प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…