पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…

पुणे: येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या कमरेच्या खालील भाग थोडाच शिल्लक असून, वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाकडून गुरुवारी (ता. 7) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, या मृतदेहाला आठ ते दहा दिवस झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून, शरीराचा बराचसा भाग कुत्र्यांनी खाल्लेला दिसून येतो आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या कमरेपासून खालील भाग थोडा शिल्लक असून, कवटी व वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्लेला दिसून येत आहे. हा मृतदेह बेवारस व्यक्तीचे असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या भागाच अनेक बेवारस लोक, बेघर लोक झोपतात, आश्रय घेतात. त्यांच्यापैकी कोणाचा हा मृतदेह असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे, याबाबतची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात अट्टल घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस पोलिसांनी केली अटक…

पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…

पुणे शहरात मॉर्निंग वॉक करताना पत्ता विचारण्याचा बहाना करून चैन चोरणारा ताब्यात…

पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!