मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे भाविकांच्या बसला मध्य रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 49 जण जखमी झाले असून, जखमी भाविकांपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली, नीलजे लोढा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

मुबई पुणे एक्स्प्रेस वे वर पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून बसमध्ये 54 प्रवाशी होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 49 जणांवर उपचार सुरू आहे. जखमींपैकी 7 ते 8 जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जखमी भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर रात्री एकच्या सुमारास पंढरपूरला जाणाऱ्या बसची धडक एका ट्रॅक्टरला झाल्याने बस थेट रस्त्याच्या खाली पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, 49 जण जखमी झाल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. सर्व प्रवाशी डोंबिवली निळजे येथील असल्याची माहिती समोर आली असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…

नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!