मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजकुमार सोनी (रा. लखीमपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे.

मृत मनोजकुमार यांचे लखीमपूर येथे दुकान होते. तर त्यांची सीतापूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीशी ओळख झाली होती. या मुलीने मनोजकुमार यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले व त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. या मधूनच मनोजकुमार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पोलिस अधिकारी अभिजीत आर. शंकर यांनी सांगितले की, ‘सैरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल ड्रिप इनच्या रुम नंबर 10 मध्ये एका व्यक्तीने अवैध पिस्तुलाने स्वत:च्या उजव्या कानाजवळ गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला, व घटनास्थळावरून अवैध पिस्तूल, एक जिवंत काडतूस व एक रिकामं काडतूस जप्त केले आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.’

मनोजकुमार यांची सीतापूर येथील तरुणीशी ओळख झाल्यानंतर तिनं त्यांचा फोन नंबर घेतला होता. त्यानंतर तिने त्यांना फोन करायला सुरुवात केली, व हळूहळू युवतीने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. पुढे पैशांची मागणी सुरू केली, व पैसे न मिळाल्यास त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून मनोजकुमार लखीमपूरहून सीतापूरला गेले होते. मात्र, प्रेयसीने त्यांना धमकावणे थांबवलं नाही. उलट तिने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप लावला. या प्रकरणी सीतापूरच्या पिसावा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मनोजकुमार यांची बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

मृत्युपूर्वी मनोजकुमार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्याकडे एक प्लॉट होता, तो मी 7 लाख रुपयांना विकला. परंतु हळूहळू माझ्या प्रेयसीची पैशाची मागणी वाढू लागली. मी तिला आतापर्यंत 9 लाख रुपये दिले होते. पण तिच्याकडून केला जाणारा मानसिक छळ सहन होत नसल्याने आत्महत्या करीत आहे. मला मृत्युनंतरही न्याय मिळाला नाही, तर आत्म्याला शांती मिळणार नाही. प्रेयसीने ब्लॅकमेल केल्याचा उल्लेख आहे.’

नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!