नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

नाशिकः मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ शुक्रवारी (ता. १२) रात्री आयशर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला. त्यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा चालक आणि क्लिनर हे दोघे जखमी झाले आहेत. अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहेमान तांबोळी, अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात ब्रेझा कार क्रमांक (एम. एच. 05 डी. एच. 9367) हिचा चक्काचूर झाला असून आयशर टेम्पो क्रमांक (एम. एच. 15 जी. व्ही. 9190) या आयशरचे ही नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपघातानंतर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्तांना तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू…

नाशिक-दिंडोरी मार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू…

पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…

वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!