दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…

धुळेः धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवरून प्रवास करत असताना सेल्फी घेणे दुचाकीस्वाराला महागात पडले आहे. दुचाकीचा अपघात झाला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

धुळे-सोलापूर महामार्गावर दुचाकीवरून दोघेजण प्रवास करत होते. दरम्यान, मागे बसलेल्या व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ रेकॉर्ड करताना त्याला सेल्फी घ्यायचा होता. त्यासाठी त्याने दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला कॅमेऱ्याकडे पाहण्यास सांगितले. दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने मागे वळून मोबाईलमध्ये बघायला सुरुवात केली. त्यावेळीच त्यांच्यासोबत धक्कादायक अपघात घडला. हा अपघात कसा झाला हे स्पष्ट झाले नसले तरी दोघेही दुचाकीवरून पडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. फोन पडला आणि काही वेळ ते असेच पडून राहिले, त्यानंतर एक व्यक्ती मदतीला आली आणि त्याने दोघांना उचलले.

दरम्यान, या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by purvanchal (@purvanchal51)

पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….

पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!