बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

ठाणे: बदलापूरमधील शाळेतील चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा आज (सोमवार) प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये असलेल्या अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदुक हिसकावून घेतली आणि स्वत: वर गोळी झाडली. या गोळीबारात अक्षय हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्याला पोलिस स्टेशनला घेऊन जात होते. जीपमधून नेत असताना अचानक अक्षय शिंदे याने एका पोलिस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि पळ काढला. यावेळी त्याने पोलिसांवरच 3 राऊंड फायर केले होते. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. अक्षयला एक गोळी लागली आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबार एक पोलिस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय शिंदे याने पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षयची प्रकृती गंभीर आहे. हा एन्काऊंटर नसून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सध्या अक्षयची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!