हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

पुणे : हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये इंजिनिअर युवतीची प्रियकराने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २८) उघडकीस आली आहे. प्रियकर ऋषभ निगम याने युवतीवर पाच गोळ्या झाडल्यानंतर शांतपणे लॉजमधून निघून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर खूनचा उलगडा झाला आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही लखनौ येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्या झालेल्या युवतीचे नाव वंदना द्विवेदी (वय २६) असे आहे. लखनौमध्ये दोघेही एकाच परिसरात राहतात. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंधही होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी वंदनी दोन वर्षांपासून हिंजवडीत नोकरी करत होती. ऋषभ गुरुवारी लॉजमध्ये गेला होता. त्यानंतर शुक्रवारी वंदना त्याच्यासोबत गेली. शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ऋषभने वंदनावर गोळीबार केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ऋषभने तिथून पळ काढला. गोळीबारानंतर ऋषभ शांतपणे तिथून बाहेर पडला आणि मुंबईला गेला.

मुंबई पोलिसांनी ऋषभला ताब्यात घेतल्यानंतर त्याने वंदनाचा खून केल्याचे सांगितले. यानंतर मुंबई पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. या माहितीनंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. हिंजवडी पोलिसांनी वंदनाच्या कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…

विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!