विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…

बीड : विवस्त्र महिला रस्त्यावरून धावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी हा प्रकार घडला. या व्हिडीओ प्रकरणी भाजप आमदाराच्या पत्नीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोघा जणांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेचे कुटुंब मागच्या काही दिवसापासून ही शेतजमीन करत आहे. मात्र, इतर दोघांनी सुद्धा त्या जागेवर आपली मालकी असल्याचा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी याच वादातून या ठिकाणी भांडण झाले आणि याच भांडणानंतर ही महिला एका पुरुषाच्या मागे विवस्त्र होऊन धावताना पाहायला मिळत आहे.

संबंधित जागेचा वाद सोडवण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्या होत्या. प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्यानंतरही तो वाद वाढत गेला. या पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये इतर दोघे आणि प्राजक्ता धस यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!