महाराष्ट्र हादरला! पोटच्या दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या…

चंद्रपूर: कौटुंबिक भांडणातून पोटच्या दोन मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागभिड तालुक्यातील मौशी गावात रविवारी (ता. ३) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अंबादास तलमले (वय 50) याने पत्नी अल्का तलमले (वय 40) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20) या तिघांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. अंबादास याला पोलिसांनी अटक केली आहे.

तलमले कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते होते. रविवारी पहाटेच्या सुमारस त्यांचातील वाद पुन्हा उफाळून आला. यात अंबादासने घरात शिवीगाळ करत वाद घातला. राग अनावर झाल्याने संतप्त झालेल्या अंबादासने टोकाचे पाऊल उचलले. पहाटेच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असतांना अंबादासने घरातील कुऱ्हाडीने मुलींसह पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी अल्का तलमले (वय 40) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20) या तिघांची अंबादासने निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि यातील संशयित आरोपी असलेल्या अंबादासला नागभीड पोलिसांनी अटक केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचा पुढील तपास सध्या पोलिस करत आहे.

धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या…

पत्नीची संशयावरून केली हत्या अन् शीर घेऊन रस्त्यावर लागला नाचू…

विद्यार्थिनीचे अंघोळ करतानाचे फोटो काढणाऱ्या आरोपीची आत्महत्या…

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

लातूर हादरले! दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या…

कुटुंबातील ५ नव्हे तर १६ जणांच्या हत्येचा होता दोघींचा कट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!