शाळेच्या इमारतीचे छत कोसळून चार मुलांचा मृत्यू; अनेकजण ढिगाऱ्याखाली…

जयपूर (राजस्थान): झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसळून चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली आहे. ढिगाऱ्याखाली 30 हून अधिक मुले अडकल्याची भीती आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, ढिगारा काढण्याचा काम सुरू आहे.

पिपलोडी गावातील सरकारी शाळेचे छत अचानक कोसळले. ढिगाऱ्याखाली 40 मुले गाडली गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर संपूर्ण गावात घबराट पसरली आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. ही शाळा खूप जुनी आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हापासून शाळेच्या इमारतीत ओलसरपणा होता. आज सकाळी मुले वर्गात बसली असताना एका वर्गाचे छत अचानक कोसळले. त्यामुळे तिथे बसलेली मुले त्यात गाडली गेली. अपघात होताच शाळेत गोंधळ उडाला.

शाळेचे छत कोसळल्याची माहिती समजताच स्थानिकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून महिला रडू लागल्या. दुसरीकजे पोलीस आणि प्रशासनाला अपघाताची माहिती देण्यात आली. यावर पोलीस प्रशासन जेसीबी आणि इतर बचाव उपकरणांसह घटनास्थळी पोहोचले. नंतर जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. ढिगार्याखाली दबल्यामुळे चार मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड! वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात पुन्हा एक कांड…

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण…

प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…

मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी होणार पोलिस भरती…

वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!