वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…

पुणे (संदीप कद्रे): सिंबायोसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाला सिंबायोसिस कॉलेजने निलंबीत केले आहे. अशोक ढोले असे या प्राध्यापकाचे नाव आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर काही संतप्त नागरिकांनी प्राध्यापकाला गाठून डेक्कन पोलिस ठाण्यात नेले होते.

पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज असलेल्या सिंबायोसिस कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचे उदाहरण देत प्राध्यापकांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्राध्यापकांचा शिकवतानाच व्हिडिओ समोर आला होता. संबंधित व्हिडीओ पाहून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्राध्यापकांना गाठून त्यांना पोलीस ठाण्यात नेले.

प्राध्यापकांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि सगळ्याकडे असलेला प्राध्यापकांच्या विधानाचा व्हिडीओ देखील दाखवला. प्राध्यापकाने 12 वीच्या वर्गात शिकवताना हे विधान केल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक अशोक ढोले यांना सिंबायोसिसच्या व्यवस्थापनाकडून निलंबित करण्यात आले आहे.

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!