पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पुणे (महेश बुलाख): तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, 2,21,500 रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठया प्रमाणात लोक वसाहत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून मोटार सायकल आणि घरफोडी होत होत्या. त्याप्रमाणे सदर मोटार सायकल चोरी आणि घरफोडी चोरीस आळा घालणेबाबत तसेच प्रतिबंध करण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन यांनी वाहन चोरांकडून तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे उघड करण्याबाबत तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यानंतर पोलिस उप निरीक्षक विजय जगदाळे व पथकातील अंमलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज गोळा करून गोपनिय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून मोटार सायकल चोरीच्या आरोपींचा शोध घेत होते.

दिनांक 29/07/2023 रोजी तपास पथकाचे पोलिस उप निरीक्षक विजय जगदाळे, स. फौजदार दिलीप कदम, पो. हवा. 646 / प्रितम वाघ, पो.ना. 1446 / किशोर गिरीगोसावी, पो. अंमलदार 3048/ उमाकांत नवगिरे, पोलिस अंमलदार 3471 / निखील देशमुख, पोलिस अंमलदार 3444 / विवेक अंभोरे हे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस उप निरीक्षक विजय जगदाळे व तपास पथकास बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी
1) राहुल दगडु शिंदे (वय 22 वर्षे, रा.वडगाव मावळ, ता.मावळ, जि. पुणे)
2) राहुल अंकुश क्षिरसागर (वय 23 वर्षे, रा. माकडवस्ती, देहुरोड, ता.हवेली, जि. पुणे) हे तळेगाव दाभाडे परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी
मिळाल्याने तपास पथकातील पेट्रोलिंग करीत असलेल्या अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी सापळा लावून आरोपींना तपास पथकाने ताब्यात घेतले.

आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सदर आरोपींकडे अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपी 1) राहुल दगडु शिंदे, 2 ) राहुल अंकुश क्षिरसागर यांनी यापुर्वी वेळोवेळी तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकुण 04 मोटारा सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर आरोपी यांच्याकडून घरफोडी केलेला मुद्देमाल टी. व्ही व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींना अटक करून 04 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्तसो परिमंडळ 2 – काकासाहेब डोळे, मा. सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलिस उप निरीक्षक विजय जगदाळे, स. फौजदार दिलीप कदम, पो. हवा.. 646 / प्रितम वाघ, पो.हवा..1400/प्रशांत निळे, पो.हवा.. 488 / रघुनाथ बगाड, पो. ना.. 1446 / किशोर गिरीगोसावी, पो. अंमलदार 3048/ उमाकांत नवगिरे, पोलिस अंमलदार 3471 / निखील देशमुख, पोलिस अंमलदार 3444 / विवेक अंभोरे यांनी केलेली आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!