वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

पुणेः पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. पुणेकरांना नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण नो पार्किंगमध्ये वाहनं लावणाऱ्यांवर आता घसघशीत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल. पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आले आहे.

वाहतूक नियम:
वाहनाचा प्रकार – दुचाकी – चारचाकी
प्रथमच दंडाची रक्कम – रु 500 – रु. 500
दुसऱ्यांदा दंडाची रक्कम – रु 1500 – रु. 1500

टोइंग चार्ज:
दुचाकी – 200 रु
चारचाकी – 484 रु

दुचाकी – रु 85.56
चारचाकी – रु 87.12

दुचाकी – रु 785.56 (पहिल्यांदा) आणि रु 1,785.56 (दुसऱ्यांदा)
चारचाकी – रु 1,071.12 (पहिल्यांदा) आणि रु 2,071.12 (दुसऱ्यांदा)

धडक कारवाईला सुरुवात…
सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या इतर उल्लंघनांवरही दंड आकारला जातो. बेपर्वा वाहनचालकांना शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे या प्राथमिक उद्देशाने आरटीओच्या पथकांनी ही कारवाई सुरु केली आहे. सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलिस उभे असतात. त्यात अनेक दुचारीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात. त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता नो पार्किंगच्या गाड्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!