पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह…

पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिस उपनिरीक्षक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दत्तात्रय कुरळे असे मृतावस्थेत सापडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

दत्तात्रय कुरळे हे पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) नियुक्तीस होते. पोलिस दलात ते शिपाई म्हणून भरती झाले होते. पदोन्नतीने ते उपनिरीक्षक झाले होते. शनिवारी (ता. १६) सकाळी कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक सात परिसरात कुरळे मृतावस्थेत सापडले. सुरुवातीला पोलिसांना त्यांची ओळख पटली नाही. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन ते पुणे पोलिस दलात उपनिरीक्षक असल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुरळे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

पोलिस स्टेशनमध्येच पोलिसकाकावर कुऱ्हाडीनं सपासप वार…

Video: मुंबईत पोलिसकाकाच्या मुलावर टोळक्याचा हल्ला…

पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…

नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…

मुंबई पोलिस दलातील पोलिसकाकाने घेतला टोकाचा निर्णय…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!