
पुणे: ‘मुळशी पॅटर्न’मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…
पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील पिट्या भाईंनी नशेच्या आहारी गेलेल्या युवतींचा धक्कादायक Video समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओ पुणे शहरातील वेताळ टेकडीवरचा आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, पोलिसकाका टीमने हे चित्र यापूर्वीच उघड केलेआहे.
पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे तर दुसरीकडे महाविद्यालयीत विद्यार्थी या ड्रग्सच्या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील विविध पबमधील चित्र तर धक्कादायक आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील पिट्या भाईची भूमिका साकारलेले अभिनेते रमेश परदेसी यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवरचा हा व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये पाहायला मिळते की, दोन महाविद्यालयीन युवती नशेच्या आहारी गेल्या आहेत. एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स प्राषण केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे.
अभिनेते रमेश परदेसी यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर येथे महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन युवती बियर, दारु आणि नशेचे काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी 4 हजार कोटींचं ड्रग्ज सापडले आहे. शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर.’
आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही. पुण्यात 4 हजार कोटी ड्रग्ज सापडले पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केले नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…
Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…
पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर
पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

