पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…
पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी महागड्या सायकली चोरी करणाऱ्या सुशिक्षीत दांम्पत्यास अटक केली आहे. नामांकित कंपनीच्या महागड्या १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
०६/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा.मंदार अपा.फ्लॅट नं ०८ आनंदनगर, अभिनव चिल्ड्रेन स्कुल समोर, सिंहगड रोड, पुणे येथील पार्किंगमधून स्नेल फिफ्टर कंपनीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सिंहगड रोड पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी व अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणद्वारे, गुप्त बातमीदारांकडे तसेच सदर परिसरामधील १०० ते १५० सी.सी.टी.व्ही कॅमेरा फुटेजची पाहणी करुन अज्ञात आरोपीचा सखोल तपास करीत असताना २६/१०/२०२३ रोजी सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचे आदेशान्वये तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक, सचिन निकम व तपास पथकातील स्टाफ खाजगी वाहनावर पेट्रोलिंग करीत होते.
वडगाव ब्रिज जवळ पोलिस अंमलदार/सागर शेडगे व पोलिस अंमलदार/राहुल ओलेकर यांना एका काळ्या दुचाकी मोपेड गाडीवरुन एक व्यक्ती व त्याच्या पाठीमागे महिला असे दोघे गाडीवरुन सायकल घेवून जात असताना संशयीतरित्या दिसले. त्यांना सोबतच्या स्टाफच्या मदतीने थांबवुन गाडी चालविणाऱ्यास नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विजय राजेंद्र पाठक (वय ३६ वर्षे. रा. सध्या प्लॅट नं आय १०३, क्लोअर कासाब्लांका, तळेगाव, पुणे. मुळ पत्ता-राक्रिश अपार्टमेट प्लॅट नं-२०१, नवरेनगर, डिबॉन रोड अंबरनाथ (इस्ट) ठाणे) व त्याच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचे नाव विचारता तिने तिचे नाव व पत्ता डायना डेंझिल डिसोजा (वय २५ वर्षे रा.प्लॅट नं आय-१०३ क्लोअर कासाब्लांका तळेगाव पुणे) असे असल्याचे सांगितले.
सायकल बाबत चौकशी करता ते काहीएक समाधान कारक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. संशय अधिक वाढू लागल्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या सायकल बाबत अधिक तपास करता त्याने व त्याचे सोबत असलेली महिला डायना डेंझिल डिसोजा हिच्या मदतीने मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकली चोरी करीत असल्याचे सांगितले. नमुद आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांना दाखल गुन्ह्याचे तपास कामी २६/१०/२०२३ रोजी अटक केली आहे. त्यांची पोलिस कस्टडी रिमांड घेवुन त्यांच्याकडे अधिक तपास करता सुशिक्षीत दांम्पत्याने मौजमजा करण्यासाठी नामांकित कंपनीच्या महागड्या सायकली चोरी केल्याचे सांगून ३,५०,०००/- रुपये किमतीच्या एकुण १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटक आरोपी यांच्याकडून एकुण सायकल चोरीचे ३ गुन्ह्याची उकल करण्यात आली असून उर्वरीत मिळून आलेल्या सायकलीचा तपास सुरु आहे. पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम सिंहगडरोड पोलिस स्टेशन पुणे शहर हे करीत आहे.
सदरची कामगिरी सुहेल शर्मा, पोलिस उप-आयुक्त परीमंडळ -३, अप्पासाहेब शेवाळे, सहा पोलिस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, अभय महाजन, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, जयंत राजुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलिस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांचे पथकाने केली.
युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…
पुणे शहरात एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना स्फोट…
पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…
पुणे शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत…
गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले तब्बल १५ मोबाईल अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!