
पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांना हत्याकांडाचं गूढ उलगडलण्यात यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून सख्या चुलत भावानेच चार लाख रुपयांची सुपारी ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
कात्रजमधील गुजरवाडी परिसरात १७ नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता, अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय ३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी अशोकला अटक करून कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, अजयचे आपल्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोकला मिळाली होती. याच संशयाच्या आणि रागाच्या भरात अशोकने अजयकुमारचा खून करण्याचा कट रचला आणि त्यासाठी सुपारी दिल्याचे सत्य समोर आले.
जहल
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी तिघांना चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. यात कृष्णकुमार विजय महतो वर्मा (वय २१), सचिनकुमार शंकर पासवान (वय २६) आणि सर्वात धक्कादायक म्हणजे खुनाच्या घटनेतील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय ३०) यांचा समावेश होता. रणजितकुमार यादव हाच खुनाचा पहिला साक्षीदार असूनही तो या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. चारही आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने मूळ गावी झारखंडकडे पसार होण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुणे! चुलत भावाची हत्या करून मृतदेह भरला पोत्यात अन् फेकला…
पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…
पुणे! वाघोली परसिरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून…
पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

