नवरी जोरजोरात ओरडू लागली अन् झाला भांडाफोड…

भोपाळ (मध्य प्रदेश): विवाहानंतर नवरीला मोटारीमधून घेऊन सासरी जात असताना पोलिसांना पाहून नवरी जोरजोरात ओरडू लागली. पोलिसांनी मोटार थांबवून नवरीची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

छत्तीसगडमधील एका मुलीला तिच्या भावाने शिवपुरीतील एका तरुणाला 1.30 लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. शिवपुरी येथील युवकाचे लग्न होत नसल्याने त्याने मुलीला लग्नासाठी विकत घेतले. मात्र मुलगी सासरच्या घरी येऊन तिच्या माहेरी जाण्याचा हट्ट करू लागल्याने त्यांनी तिला राजस्थानमध्ये विकण्याचा कट रचला. ते तिला राजस्थानला घेऊन जात असताना वाटेत युवती पोलिसांना पाहून आरडाओरडा सुरू केला आणि अखेर पोलिसांनी मुलीची सुटका केली आहे.

पोलिसांनी मुरैना येथील बनमोर येथील बुद्धपुरा एसएसटी चेकिंग पॉइंटवर तपासणीसाठी एक कार थांबवली. मोटारीमध्ये नवरीसह 6 जण होते. त्यानंतर नववधूने पोलिसांना सांगितलं की, साहेब, कृपया माझा जीव वाचवा. हे लोक मला विकणार आहेत. हे समजताच पोलिसांनी सर्वांना गाडीतून बाहेर काढले. नवरीने सांगितले, मूळची ओडिशाची असून, कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून छत्तीसगडमधील बिलासपूर येथे वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी तिच्या भावाने तिला शिवपुरी येथील रवींद्र लोधी अवघ्या 1.30 लाख रुपयांना विकले. त्यानंतर रवींद्रने मनाविरोधात लग्न केले. 10 दिवसांनंतर तिने आपल्या माहेरच्या घरी जाण्याचा हट्ट धरल्यावर तिला नजरकैदेत ठेवले. कोणाला फोन करू नये म्हणून सासरच्यांनी वधूचा फोनही तोडला. तरीही, वधू ठाम राहिली आणि तिच्या सासरच्या मंडळींना समजलं की तिला असं कोंडून जास्त काळ ठेवता येणार नाही. मग तिला राजस्थानात विकायचे असं त्यांनी ठरवलं. याबाबत भरतपूरमधील कोणाशी तरी चर्चा करण्याचं त्यांनी ठरवले. बुधवारी सासरचे 5 जण वधूसोबत कारमध्ये चढले आणि तिला भरतपूरला घेऊन जाऊ लागले. मात्र, वधूने वाटेतच तपासणी करणाऱ्या पोलिसांना सर्व काही सांगितले.’

पोलिसांनी नवरदेव रवींद्र, त्याची आई, वडील रघुपती, मेहुणा भूपेंद्र जाट, मावशी शारदा आणि दीपिका यांना अटक केली आहे. रवींद्रने पोलिसांना सांगितले की, लग्न जमत नसल्यामुळे कोणीतरी त्याला या मुलीबद्दल सांगितले. रवींद्रने मुलीच्या भावासोबत 1.30 लाख रुपयांचा करार करून वधू खरेदी केली. सध्या वधूच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वधूच्या भावालाही अटक करण्यात येणार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!