
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला जामीन; सुनावणीवेळी…
सोलापूर: उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. २४) जामीन मंजूर केला आहे. जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड.धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवल्याचे सांगितले.
बीडच्या लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबरला नर्तिका पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून पूजा गायकवाड ही अटकेत होती. पहिल्या दिवसापासून ती याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. नर्तिका पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात अॅड. धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर केला.
जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड.धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवल्याचे सांगितले. मृताने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. केसचा तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हा युक्तिवाद मान्य करत बार्शी सत्र न्यायालयाने पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर केला आहे.
गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…
उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…
नर्तकी पूजा हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या नात्याविषयी सांगितले…
सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…
उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…
प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…
बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

