प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

मुंबई : प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री रंजूषा मेनन (वय ३५) हिने आज (सोमवार) तिरूवनंतपुरम येथील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीने मृत्यूच्या काही तास आधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अभिनेत्रीच्या मृत्युमुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अभिनेत्री रंजूषा ही मागील काही दिवसांपासून नवरा आणि मुलांबरोबर श्रीकार्याम येथे भाडेतत्त्वार घेतलेल्या घरात राहत होती. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.’

दरम्यान, अभिनेत्री रंजूषा मेनन ही मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक मालिकांमध्ये तिने सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. अभिनयाने तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. पण तिच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्रीने सेलिब्रेटी कुकरी शो सेलिब्रेटी किचन मॅजिकमध्ये कॉन्टेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड अँक्टिव्ह होती. तिने मृत्यूच्या एक दिवस आधी 29 ऑक्टोबर रोजी एक रील शेअर केला होता. तिच्या रीलवरून सर्व काही ठीक असल्याचे दिसत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी तिने जगाचा निरोप घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sreedevi Anil (@anil_sreedevi)

अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

Video: ‘जेलर’ फेम अभिनेता विनायकनला अटक; कारण…

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!