पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…

पुणे : पुणे शहरातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (ता. २९) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळी झाडून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल साहू असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

अनिल साहू हे घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू हे झोपेत असताना अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि साहू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. हा प्रकार घडला तेव्हा साहू यांचे कुटुंबीय देखील घरात होते. गोळ्या झाडल्या नंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या साहू यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डक्टरांनी सांगितले.

पुणे शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खडक पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. खून नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

वाघोलीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण अन् हवेत गोळीबार…

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!