स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशाने स्वारगेट बस स्टँण्ड येथे होणा-या मोबाईल चोरी व इतर चोरीच्या होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याकामी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावरुन तपास पथकातील पोलिस अंमलदार स्वारगेट पोलिस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पो/अं संदीप घुले, पो/अं अनिस शेख, पो/अं सुजय पवार, पो/अं फिरोज शेख यांना त्यांचे गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन संशयित इसम स्वारगेट बस स्टॅण्ड येथे संशयितरित्या फिरत आहेत.
सदरबाबत माहिती तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे व पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांना सांगितली असता त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना दिली असता वरिष्ठांनी योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यावरुन सदर ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री केली असता दोन संशयित संशयितरित्या फिरत असताना दिसून आले. शिवाय, घटनास्थळावरून पळून जावू लागल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
१) गणेश बालाजी भांडेकर वय २१ वर्षे धंदा मजुरी रा. खाडगाव रोड लातूर
१) मैनुद्दीन इरफान पठान वय २४ वर्षे धंदा रिक्षाचालक रा. सदर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गु.र.नं.६७/२०२३ भा.दं.वि. ३७९,३४ मधील विवो कंपनीचा मोबाईल चोरी केल्याचे कबुली दिली. सदर मोबाईल जप्त करणेकामी लातुर येथे जावून तपास केला असता दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल तसेच सदर आरोपींचे घरझडती दरम्यान १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण २० मोबाईल फोन मिळून आले. ते पुढील तपासकामी ताब्यात घेवुन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, नारायण शिरगावकर, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, व पोहवा मुकुंद तारु, शिवा गायकवाड, संदीप घुले, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे, दिपक खेंदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळून केली आहे.
पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…
येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…
मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…