पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

पुणे (संदीप कद्रे): मोबाईल जबरीने चोरणारे दोघांना तात्काळ अटक करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. मोबाईल हिसकावताना वापरलेले वाहन देखील चोरीचे निघाले असून, ते ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर बातमी अशी की, दिनांक २३/०८/२०२३ रोजी मुंढवा पोलिस ठाणे हददीत राजी २० /०० वा चे सुमारास विशाल विनायक भंडारी (वय ३०, धंदा रिक्षाचालक रा. संभाजीचौक केशवनगर मुंढवा पुणे) हे सर्पमित्र असून ते त्यांचे काम संपवून कल्याणी बंगला रोडवरुन घरी परतत होते. त्यांच्या रिक्षाला दोन अज्ञातांनी दुचाकी आडवी लावून त्यांच्या खिशातील ८००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एम ११ कंपनीचा मोबाईल जबरीने चोरुन नेला होता. याबाबत मुंढवा पोलिस ठाणे येथे फिर्यादी यांचे सांगणेवरुन गुन्हा रजि नं २८४/२३ भा द वी ३९२ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपासाचे पुढील आदेश मुंढवा पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी तपास पथक प्रमुख संदीप जोरे व टिम यांना दिल्यावर सदर गुन्हयाचा तपास करीत असताना स्प्लेंडर सारखे वाहन घेवून दोन जण गुरुक्रुपा सोसायटी केशवनगर येथे आडोशाला थांबलेले तपास पथकाला दिसल्यावर त्या दोन जणांना पाहताच संशय आला. त्यांची कसून चौकशी केली असता व त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्या ताब्यात पोलिस तपास करीत असलेल्या गुन्हयातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा एम ११ कंपनीचा मोबाईल मिळून आला व त्यांचे ताब्यात असलेले वाहनाबाबत व त्याचे कागदपत्राबाबत अधिक चौकशी केली त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता सदर वाहन त्यांनी भोर जि पुणे ग्रामिण येथून चोरल्याचे सांगितले. सदरबाबत एमएच १२ व्हीडी १५७५ हे वाहन चोरी गेलेबाबत भोर पोलिस ठाणे पुणे ग्रामिण येथे गुर नं ४०/२०२३ भादवी ३७९ दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या दोन जणांची नावे पुढीलप्रमाणे-
१) अजय महेश देशमुख वय २२ वर्षे रा सीओ माने म्हसोबा वस्ती रेल्वे पटरी जवळ मांजरी पुणे (मुळ रा. लोहगाव जि उस्मानाबाद)
२) आकाश बालाजी ढवळे वय २३ वर्षे रा सीओ माने म्हसोबा वस्ती रेल्वे पटरी जवळ मांजरी पुणे मुळ रा किल्लारी कार्ला ता औसा जि लातूर असे आहे. अटक मुदतीत त्यांचेकडे अधिक चौकशी चालू आहे.

पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णीक, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे विक्रांत देशमुख, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, प्रदिप काकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…

पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…

पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!