
हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांचा स्मृतीला दिला पुर्नवावाहाचा प्रस्ताव; पाहा कोणासोबत…
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. यानंतर हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांनी सुनेला पुर्नवावाह करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हुतात्मा कॅप्टन अंशुमनचे वडील रवी प्रताप म्हणाले, ‘माझ्या लहान मुलाचं स्मृतीसोबत लग्न लावण्यास तयार आहेत. स्मृती यांना अंशुमनच्या आठवणी घेऊन या घरात राहायचे असेल तर ती राहू शकते. लहान मुलगा स्मृतीपेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. स्मृती या घरासाठी मुलगी आणि सून दोन्ही आहे. तिने धाकट्या मुलाशी लग्न केलं, तर ते तिला मुलीप्रमाणे ठेवतील.’
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
सुनेशी लग्नाबद्दल बोलले तेव्हा स्मृती म्हणाली की, ती फक्त 26 वर्षांची आहे. तिचं संपूर्ण आयुष्य अजून बाकी आहे. हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आल्यापासून त्यांच्या आई-वडिलांनी सून स्मृती यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. सून घरातून खूप दिवसांआधीच निघून गेली, असेही ते म्हणाले. तिने स्वतःला सावरण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र अनेक दिवस होऊनही ती घरी परतलीच नाही आणि तिने काही सांगितलेही नाही. पण, जर तिने धाकट्या मुलाशी लग्न केले आणि त्यांना दोघांना बाळ झालं तर ते हे मूल स्मृतीकडे सोपवतील. त्या मुलाच्या वडिलांच्या कॉलममध्ये अंशुमनचे नाव लिहिलं जाईल. जो काही वारसा असेल तो आम्ही या मुलाला देऊ. स्मृतीची जी इच्छा असेल, ती आम्ही स्वीकारू, असेही रवी प्रताप यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपती भवनात गेल्यावर हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांच्या घराचा पत्ता बदलण्यात आला होता, असा आरोप कॅप्टनच्या वडिलांनी केला आहे. यालाही आपला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. मला कीर्ती चक्राला चक्र माझ्या हातात घ्यायचं होतं आणि कवटाळायचं होते. पण मला स्पर्शही करू दिला नाही. माझी ओळख काढून घेतली गेली, असेही रवी प्रताप यांनी म्हटले आहे.
हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…
जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

