पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…

पुणे (संदीप कद्रे): नशा भागविण्यासाठी पहाटेच्या वेळी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास युनिट-१, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून एकुण ३२ मोबाईल व ०१ दुचाकी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिनांक ०३/०९/२०२३ रोजी हिरा सदन बिल्डींग, सोमवार पेठ, पुणे येथे अज्ञात व्यक्तीने उघडया दरवाज्या वाटे आंत प्रवेश करुन ३३,००० रुपये किंमतीचे ०४ मोबाईल व रोख रक्कम चोरी केली म्हणून सदरबाबत समर्थ पोलिस ठाणे गुरनं. १९६ / २०२३ भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिल्याने सदर आदेशान्वये युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार गुन्हयांचा समांतर तपास करीत होते. ०९/०९/२०२३ रोजी पोलिस अंमलदार, दत्ता सोनावणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील व्यक्ती हा सध्या त्रिकोणी गार्डन, भवानी पेठ, पुणे येथे येणार असुन, त्याचेजवळ एक सॅकबॅग आहे.

सदर बातमीचे अनुशंगाने युनिट १ चे प्रभारी अधिकारी वपोनि शब्बीर सैय्यद यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले. युनिट १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन बातमीदारांने दिलेल्या वर्णनाप्रमाणे रैय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख (वय २० वर्ष रा. सना बेकरीजवळ, निहाल हाईटस, फ्लॅट नं. ३०३, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे) यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले. गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करीत असताना, त्याचे ताब्यातील सॅक बॅग दोन पंचासमक्ष उघडून पाहिली असता, त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ३२ मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले आहे. त्याने सदरचे एकुण ३२ मोबाईल हे पुणे शहरातील वेग-वेगळया ठिकाणाहून उघडया दरवाज्या वाटे व खिडकीवाटे तसेच पायी जाणारे लोकांचे हिसकावुन चोरले असलेबाबत कबुली दिली आहे. तसेच त्याचे ताब्यातील दुचाकी मोटार सायकल ही देखील मोबाईल चोरी करण्यासाठी चोरली असल्याचे सांगितले आहे.

सदरचे गुन्हयात त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडून ५,६८,३००/-रुकिंचे ३२ मोबाईल व ०१ मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ३२ गोबाईल पैकी ०१ मोबाईल समर्थ पोलिस ठाणे कडील वरील गुन्हयातील असल्याचे समजल्याने, त्यास पुढील कारवाईकामी समर्थ पोलिस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हा कोंढवा पोलिस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, तो रात्री बिल्डींगचे खाली पार्किंग मध्ये पार्क ठेवलेली दुचाकी चोरुन दुचाकीवरुन परिसरात टेहाळणी करुन, मोबाईल चोरुन पुन्हा दुचाकी आहे त्याच बिलडींगला पार्क करीत होता. सदर आरोपीने पुणे शहरातील खडक फरासखाना, कोंढवा, समर्थ पोलिस ठाणे हद्दीत जुलै २०२३ ते ०३ सप्टेंबर २०२३ रोजी दरम्यान चोऱ्या केल्या आहेत.

सदर आरोपीकडून आतापर्यंत एकुण ०९ गुन्हे उघडकीस आणले आहे. तरी खडक, फरासखाना, कोंढवा, समर्थ पोलिस ठाणे तसेच पुणे शहरातील नागरीकांना कळविण्यात येते की, नमुद कालावधी मध्ये पहाटेचे वेळी उघडया दरवाजे वाटे, खिडकी वाटे कोणाचे मोबाईल चोरीस गेले असल्यास, त्यांनी युनिट-१,गुन्हे शाखा, पुणे बंगला नं.३, पोलिस अधिकारी वसाहत सोमवार पेठ पुणे येथे समक्ष संपर्क साधावा.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त,गुन्हे-१,पुणे, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शब्बीर सैय्यद, सपोनि. आशिष कवठेकर, पोउनि सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार, दत्ता सोनावणे, आण्णा माने, अभिनव लडकत, शुभम देसाई, अजय थोरात, अमोल पवार, शशीकांत दरेकर यांनी केली आहे.

I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!