
मुंढवा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-मुलीची घडवून आणली भेट…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे पोलिसांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत हरवलेली मुलगी ०१ तासाच्या आत शोधून आईच्या स्वाधीन केली. मुलीच्या आईने पोलिसांचे आभार मानले आहेत.
मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस ठाणे स्तरावर चौकी तक्रार, डायल ११२, कंट्रोलरुम पोलिस मदत कॉलची वेळेत पुर्तता होणे, वेळेत पोलिस मदत मिळणे करीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलिस ठाणे कडील अधिकारी अंमलदार यांचे व्हॉटस्अप ग्रुप तयार केले आहेत. सदर ग्रुपवर सर्व कॉलची तसेच तक्रारींची माहिती शेअर करुन विहीत वेळेत तक्रारींची पुर्तता करण्यात येते.
केशवनगर बिट मार्शल यांना ०१/०३/२०२४ रोजी कॉलर सरिता (रा. एसएनबीपी स्कुल, मांजरी, पुणे) यांनी एक चौदा वर्षाची मुलगी ही सिद्धी बिल्डींग पार्कींगमध्ये मिळुन आली असल्याचा कॉल प्राप्त झाला. सदरचा कॉलचे पुर्ततेकामी बिट मार्शल रवाना झाली. तसेच सदर कॉलचा फोटो पोलिस ठाणे कडील ग्रुपवर शेअर केला, सदर वेळी मुंढवा पोलिस ठाणे येथे एक महिला त्यांची १४ वर्षांची मुलगी हरवलेली असल्याची तक्रार देणेकरीता आल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक, शुभांगी मगदुम यांनी त्यांचेकडे विचारपुस करुन मुलीचा फोटो घेवून केशवनगर बिट मार्शला पाठवून खात्री करणे बाबत सांगितले. प्राप्त झालेल्या कॉलमधील मुलगी व पोलिस ठाणेस तक्रार देणे करीता आलेल्या तक्रारदार यांची मुलगी ही एकच असल्याची खात्री झाली. सदरची माहिती ही तक्रारदार महिलेला दिली असता त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. सदर मुलीस पोलिस ठाणेस घेवून आल्यानंतर मुलीची व आईची भेट झाल्यानंतर त्यांनी एकमेकींना मिठी मारली. सदर मुलीस त्यांचे आईचे सुखरुप
ताब्यात दिले असता त्यांनी पोलिसांनी केलेल्या सहाकार्य व मदतीस भारावून निशब्द होवून आनंद अश्रूद्वारे कौतूक केले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे पोलिस उप आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलिस उपनिरीक्षक, शुभांगी मगदुम, पोलिस अंमलदार सचिन अडसुळ, प्रविण कोकणे, स्नेहल शिंदे यांनी केली आहे.
मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टलसह तडीपार आरोपीला केले गजाआड…
पुणे शहरात रिक्षांचे टायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी केले गजाआड…
मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…
पुणे शहरातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; मुंढवा पोलिसांकडून सत्कार…
मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…

