कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने मोका गुन्ह्यातील ५ महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

कोंढवा पोलिस स्टेशन गुरनं. १०१९/२०२३ भादवि कलम ३०७,५०४,५०६, ३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) कलम ३ (१), ३(२), ३ (४) मधील पाहिजे आरोपी ओमकार दिपक जाधव (वय २०, रा. आदर्शनगर उरुळी देवाची पुणे) हा गेले पाच महिन्यांपासून मिळून येत नव्हता. सदर आरोपी मिळून येणेकामी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ०५चे आर. राजा यांनी वपोनि संतोष सोनवणे, पोनि गुन्हे मानसिंग पाटील यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने त्यांनी तपास पथकास सुचना देवून आरोपीचा शोध घेणेबाबत कळविलेवरुन सपोनि दिनेशकुमार पाटील यांनी १६/०२/२०२४ रोजी टिम तयार करुन आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले.

हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार शाहीद शेख व संतोष बनसुडे यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की, वर नमुद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ओमकार जाधव हा हांडेवाडी चौक येथे थांबलेला असल्याची माहिती मिळताच सदरची बातमी त्यांनी सपोनि दिनेशकुमार पाटील यांना कळविली. लागलीच सपोनि दिनेशकुमार पाटील हे त्यांचेसोबत असेलला स्टाफ पोलिस हवा. सतिश चव्हाण, पोहवा विशाल मेमाणे, पोलिस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला यांचेसह हांडेवाडी चौक येथून आरोपी ओमकार दिपक जाधव यास ताब्यात घेतले आहे.

संबंधित कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, प्रविण पवार, सह पोलिस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त परि.०५, शाहुराव साळवे सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलिस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.

कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…

कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…

कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!