लोणीकंद पोलिसांनी ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’साठी केले ७६ किमी दौड…
पुणे (संदीप कद्रे): देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’करिता ७६ किमी दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लोणीकंद पोलिस ठाणे कडील सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिसांतर्फे व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा या विषयांवर विविध प्रकारे विविध पातळीवर वेगवेगळे उपक्रम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर यांचे वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे शहर येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या संकल्पनेतून पोलिस ठाणे हद्दीत व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा याकरिता १४/०८/२०२३ रोजी ७६ किमी रिले दौड चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लोणीकंद पोलिस ठाणे कडील सर्व अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
बकोरी फाटा येथून सकाळी ०६/३० वा. रिले दौड ला सुरुवात केली. तेथुन पुढे जेएसपीएम कॉलेज रोड, आयव्ही इस्टेट रोड, केसनंद फाटा, डोमखेल रोड, बायफ रोड, वाघोली गाव, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, केसनंद, वाडेगाव, वाडेबोल्हाई, आष्टापुर, पिंपरी सांडस, बुर्केगाव, डोंगरगाव, पेरणे गाव, वढु खुर्द, तुळापुर, फुलगाव, आळंदी फाटा अशी दौड करत लोणीकंद पोलिस ठाणे, पुणे येथे शेवट करण्यात आला. दौड दरम्यान गावोगावी पोलिसांचे चे स्वागत करण्यासाठी शेकडो नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. सदर प्रत्येक ठिकाणी व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा चे अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला व देश भक्तीपर घोषणा देण्यात आला. सदरचे उपक्रमामुळे खेडोपाडी उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. शिक्षकांनी व्यवसमुक्ती व महिला सुरक्षा करिता त्यांचे विद्यार्थ्यांना अधिक सजग करुन वेळीच पोलिसांना माहिती देवुन अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठीत नागरिक यांनी सदर उपक्रमाचे स्वागत करुन कौतुक केले.
सदरची व्यसनमुक्ती व महिला सुरक्षा संदर्भातील दौड ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त, संजय पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहाने आयोजित करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे नेतृत्वाखाली पार पडली.
लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…
पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…