कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या खुनाची कोंढवा पोलिसांकडून १० तासात उकल करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीतील पारशी मैदान येथे सोमवारी (ता. ४) शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद, वय ५५ वर्षे, रा. ताहिर हाईट्स, भाग्योदयनगर, कोंढवा पुणे यांच्या पोटात, गळयावर धारधार हत्याराने भोकसून वार करुन खुन करण्यात आला होता. खुन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेवुन ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिल्या होत्या. कोंढवा पोलिस ठाणेकडील दोन पथके रवाना करण्यात आली होती.
सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्याचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार विकास मरगळे व जयदेव भोसले यांना त्याच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती की, पिसोळी भागातील एका बंद बिल्डीगमध्ये एक व्यक्ती काल रात्री पासुन घाबरलेला अवस्थेत थांबुन असुन त्याने काही गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. तेव्हा सदर ठिकाणी तपास पथकातील अंमलदारासह रवाना होवून पिसोळी भागातील धमार्वत पेट्रोल पंपाच्या मागील बाजुस असणाऱ्या बिल्डींगमध्ये एक व्यक्ती टेरेसवर लपुन थांबल्याचे दिसले. जावेद खान (वय २६ वर्षे, रा. किंग स्टन इलेसिया सोसायटी अॅथॉनिनगर, पिसोळी पुणे) असे त्याचे नाव आहे. त्यास ताब्यात घेवुन पोलिस ठाणेस आणुन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदारासह आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरुन खुनाचा कट करुन शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद, यास पारशी मैदान येथे सद्दाम शेख, साहिल शेख याच्यासह घेवून जावुन त्यास दारु पाजुन त्यानंतर त्याचा सर्वांनी मिळून चाकू सारख्या हत्याराचा वापर करुन पोटात गळ्यावर धारधार हत्याराने भोकसुन वार करुन खुन केल्याची कबुली दिली आहे.
खुन करण्याच्या कारणाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद याचा बँकेकडून घेतलेल्या क्रेडिट कार्डचे आर्थिक देवाण घेवाणी वरुन त्याच्यात दोन तीन तीन दिवसापुर्वी वाद झाले होते. त्यावेळी शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद याने आरोपी यांना शिवीगाळ केली होती. त्याच्या कारणावरुन चिडून दोन दिवसापासुन खुन करण्याचे प्लॅनिंग करुन ०३/१२/२०२३ रोजी पारशी मैदान येथे घेवुन जावुन खुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यास अटक करण्यात आली असून शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद याच्या खुनाबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले हे करीत आहेत. तसेच सदर पाहिजे आरोपी सद्दाम शेख, साहिल शेख याला गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर चे पोलिस निरीक्षक महेश बालकोटगी व त्याचे पथकाने ताब्यात घेतले आहे.
संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, रंजन शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, विक्रांत देखमुख, पोलिस उप आयुक्त सो परि.०५, मा. शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संदिप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, पो.हवा.२८३ अमोल हिरवे, पो.शि.८६४६ जयदेव भोसले, पो.शि.९१२६ विकास मरगळे, पो हवा ७९ निलेश देसाई, पो.शि.१०११४ सुहास मोरे, पो. शि. १००२६ राहुल थोरात, पो. शि. ८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो. शि. ८७५१शशांक खाडे, पो. शि. ८५०४ आशिष गरुड, पो. हवा.६९४६ राहुल वंजारी, पो. शि. ५७८ रोहित पाटील यांनी केली आहे.
कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…
कोंढवा पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करुन आरोपींना उत्तर प्रदेशातून केले जेरबंद…
कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…
कोंढवा पोलिसांनी गंभीर गुन्हयातील फरारी आरोपींना केले जेरबंद…
कोंढवा पोलिसांच्या सापळ्यात अडकला पाहिजे असलेला आरोपी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!