
कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; पिस्टल, काडतुसे जप्त…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरामध्ये सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, ०२ पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोंढवा पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे १७/०२/२०२४ रोजी दैनंदिन कर्तव्यावर हजर असताना सहा पो निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना सायंकाळी १९/०० वा. चे सुमारास खास बातमीदाराने माहिती दिली की, बोपदेव घाटाकडे जाणारे रस्त्याचे चढावर हॉटेल गारवा हिल्स हॉटेलमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीमधून तीन व्यक्ती जेवायला येणार आहेत. त्यांचेजवळ पिस्टल सारखे हत्यार आहे. कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे आदेशाने सहा. पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलिस स्टाफ सदर ठिकाणी गेले होते.
पोलिसांनी खात्री करता सदरची संशयित चार चाकी गाडी ही गारवा हॉटेलचे थोडेसे पुढे घाटाच्या बाजुस गिनी सोसायटीच्या समोरील बांबूच्या कंपाऊंडमध्ये थांबलेली असल्याचे समजल्याने त्याप्रमाणे लागलीच तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलिस स्टाफने सापळा रचुन बातमीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची चार चारचाकी व तिचे बाजुला तीन जण गप्पा मारत थांबलेले दिसल्याने त्यांना वरील पोलिस स्टाफने सायं. २०.१५ वा. आहे त्या परिस्थितीत पकडले.
१) प्रफुल्ल निवृत्ती निकम (वय ४१ वर्षे, रा. मु. पो. साकुर्डी, ता. कराड, जि. सातारा),
२) सिमॉन रोमिओ मिरींडा (वय २५ वर्षे, रा. माझीवडा गाव, वेलनकणी बिल्डींग, तळमजला रुम नं. १, ठाणे वेस्ट)
३) समीर भगवान संकपाळ (वय २५ वर्षे, रा. मु. पो. मोप्रे, ता. कराड, जि. सातारा) अशी तिघांची नावे आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता १) प्रफुल्ल निवृत्ती निकम याचे कमरेला एक लोखंडी सिल्व्हर गोली रंगाची पिस्टल व तीन जिवंत काडतुसे व २) सिमॉन रोमिओ मिरींडा, याचेकडे एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे मिळून आले. त्यांचेकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने त्यांचे विरोधात कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं. १७३ / २०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपींकडुन १,०३,०००/- रु. किंमतीचे ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे तसेच त्यांचेकडील असलेली १,७५,०००/- रु. किं. ची एक सिल्व्हर रंगाची शेवरोलेट कंपनीची चार चाकी गाडी तिचा आरटीओ रजिस्ट्रेशन नं. एमएच १६ / एबी / ३८०६ असा एकुण २,७८,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची अग्नीशस्त्रे त्यांनी जवळ का बाळगले याबाबत तपास अधिकारी पो.हवा. सतिश चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.
संबंधित कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर. राजा, पोलिस उप-आयुक्त परि.०५, गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस हवालदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, पोलिस अंमलदार शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, यांच्या पथकाने केली आहे.
कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…
कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

